महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर शेवगाव तालुका अध्यक्ष पदी सज्जाद पठाण


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर शेवगाव तालुका अध्यक्ष पदी सज्जाद पठाण

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी) महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात  नुकतीच झालेल्या बैठकीत शेवगाव येथील दैनिक जनप्रवास वृत्तपत्राचे पत्रकार तसेच महाराष्ट्र भूमी वेब चैनल चे प्रतिनिधी सज्जाद नजीर पठाण यांची शेवगाव तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.

      बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचलन महाराष्ट्र लघु वर्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचा विस्तार करणे बाबत चर्चा करण्यात आली तसेच सज्जाद पठाण यांचा वृत्तपत्र क्षेत्रातील तीस वर्षाचा कार्यकाळ व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेता या पदावर त्यांची निवड करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले. बैठकीस  पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी.के.सौदागर, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहम्मद, प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार, पत्रकार संघाचे प्रदेश सचिव श्री.किशोर गाडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, कलीम भाई शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड,गुलाब भाई वायरमन,मुरलीधर किंगर आदी पत्रकार उपस्थित होते.

        उपस्थितांचे आभार अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News