शिर्डी: तृप्ती देसाईने संस्थानच्या फलकाला हात लाऊन दाखवावा – रंजना सावंत


शिर्डी: तृप्ती देसाईने संस्थानच्या फलकाला हात लाऊन दाखवावा – रंजना सावंत

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

 रंजना संजय सावंत अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिर्डी महिला आघाडी ,सर्व प्रथम श्री साईबाबा संस्थान चे कार्यकारी अधिकारी  कान्हूराज बगाटे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करते व साहेबांना धन्यवाद देते की आपण जो निर्णय घेऊन फलक लावले की भारतीय वेष परिधान करून श्री साई मंदिरात दर्शनास येण्याची विनंती केली आहे ,परंतु माझ्या मते ती सक्ती असावी कारण आपण भारतीय आहोत व भारतीय संस्कृती जपणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे ,आणि तृप्ती देसाई जे वक्तव्य करत आहे ते अतिशय निंदनीय आहे  मी रंजना संजय सावंत भाजपा अध्यक्ष महिला आघाडी व भाजपा शिर्डी शहर आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने तृप्ती देसाईच्या अधर्मी वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे . शिर्डी मध्ये तृप्ती देसाईं ला  जशास तसे उत्तर महिला आघाडी च्या वतीने देण्यात येईल याची तिने नोंद घ्यावी  असे परखड मत  सो,रंजना सावंत  भारतीय जनता पार्टी शिर्डी महिला अध्यक्षांच्या वतीने सांगण्यात आले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News