शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थानने साई मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी येत असतांना भारतीय पेहरावात यावे असे फलक लावल्याने भुमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी हा प्रकार संविधान विरोधी असल्याचे सांगत हे फलक काढावे अन्यथा शिर्डीत येऊन हे फलक हटवू असे सांगितल्या ने हा विषय चिघळला असल्याचे चिञ दिसत आहे..
दरम्यान साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने भारतीय पेहरावात यावे ही विनंती केली असुन ती सक्ती नाही असे सांगत शिर्डी ग्रामस्थ याविरोधात बोलणार नाही माञ मी शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष या नात्याने तृप्ती देसाई यांना सांगू इच्छिचे की भारतीय संस्कृती जपणे आपले काम आहे आणि जर शिर्डीत यायचेच असेल तर मग शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असे जगताप यांनी सांगितले
साईबाबा संस्थानने ड्रेस कोड बाबत सक्ती केलेली नाही,मंदिराचे पावित्र्य राखावे ,भारतीय संस्कृती चे पालन करणे आपले काम आहे, साईबाबा प्रशासनने भक्तांना विंनती केली आहे ,सक्ती केलेली नाही
साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधीकारी कान्हूराज बगाटे साहेबांचे अनेक साई भक्तांनी, शिर्डी ग्रामस्थांनी,घेतलेल्या भक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे