रेखा जरे हत्या प्रकरण, मुख्यआरोपी पत्रकार बाळासाहेब बोठे फरार


रेखा जरे हत्या प्रकरण, मुख्यआरोपी पत्रकार बाळासाहेब बोठे फरार

अहमदनगर –(प्रतिनिधी संजय सावंत) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याप्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी कडून तपास करताना मुख्य सूत्रधाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.अहमदनगरचे जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोटे यांनी या हत्याचा कट रचला असून त्यांनीच अटक केलेल्या पाच आरोपींना रेखा जरे यांची सुपारी दिली होती. तर या खात्याच्या मुख्य आरोपी बाळासाहेब बोटे यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून पाच पथके रवाना झाली आहे अशी माहिती  जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली. 30 नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी पुण्याहून अहमदनगर येत असताना जतेगाव घाटात त्याच्या गाडीला कट मारला म्हणून दुचाकी स्वार आणि रेखा जरे यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही आरोपीं  दारूच्या नशेत असल्याने त्यांना रेखा जरे यांची नेमकी कोणती गाडी आहे हे कळत नव्हते या मुळे आरोपींनी आधी गाडीचा फोटो पाठवला मुख्य सूत्रधारला पाठवला त्या पासून त्यांना  ग्रीन सिग्नल भेटल्यावर त्या आरोपीने गाडीत डोकावले त्यात तीन महिला होत्या या पैकी रेखा जरे कोण आहे यासाठी परत एखादा फोटो काढत मुख्य सूत्रधाराला पाठवले त्यालाही ग्रीन सिग्नल भेटल्यावर आरोपीने जरे यांचे केस पकडून अतिशय निर्दयपणे गळा कापला. त्यामुळे गाडीत बसलेली महिला आणि जरे यांचा मुलगाही घाबरले सोबत असलेल्या महिलेने जरे याना दुसऱ्या सीटवर बसवले आणि 100 ते120 च्या गतीतीने गाडी टोलनाक्यावर आणली तिथे असलेल्या रुग्णवाहिकेने त्यांना शासकीय रुग्णालयात आणले तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News