संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
भाजप सरकारने शेतकरी व कामगार यांच्या विरोधात लादलेल्या नव्या काळ्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ आणि दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय कोपरगाव येथे अ.जिल्हा युवक काँग्रेस,कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करून तहसीलदार योगेश चन्द्रे यांना कासली येथील शेतकरी सुखदेव किसन जमधडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले,यावेळी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,कोपरगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा सचिव राजुभाई पठाण,सचिव सुनील भगत,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय आंग्रे,विद्यार्थी काँग्रेसचे आशपाक सय्यद,विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सचिव निरंजन कुडेकर,दादा आवारे आदिंसह काँग्रेस पक्षाचे फ्रटंल पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.