शेतकऱ्यांना दिवसा12 घंटे उच्च दाबाने लाईट द्या दत्तात्रय फुंदे


 शेतकऱ्यांना दिवसा12 घंटे उच्च दाबाने लाईट द्या दत्तात्रय फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या महिनाभरापासून बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक शेतकरी रात्रीची लाईट असताना शेतामध्ये जाण्यासाठी टाळाटाळ करत आहेत तसेच रात्रीची लाईट धोकादायक असल्याने अनेक शेतकऱ्यांना सर्पदंश झाला आहे किंवा करंट बसल्याने अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यातच यावर्षी सर्व शेतकऱ्यांना पाणी असल्यामुळे गहू हरभरा ऊस या पिकांची पेरणी चालू आहे त्यामुळे रात्रीचा पाणी देणे आवश्यक झाले आहे तसेच बिबट्याच्या दहशतीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे  त्यामुळे शेतकरी रात्री पाणी भरण्यासाठी बाहेर पडत नाही त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे यापूर्वी कोरोनाचाही फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे  तातडीने शेतकऱ्यांना दिवसाची उच्च दाबाने 12 घटे लाईट देण्याची मागणी  स्वाभिमानी शेतकरी संघटने कडूण व शेतकऱ्यांमधून होत आहे  महावितरण ने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभा करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहिल याबाबतचे निवेदन लवकरच महावितरण व तहसीलदार यांना देण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी दिली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News