संजय गांधी निराधार योजनेची 75 प्रकरणे मंजूर


संजय गांधी निराधार योजनेची  75  प्रकरणे मंजूर

प्रतिनिधी-भालचंद्र महाडिक

बारामती, दि. 03 :-  संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवड सभा 27 नोव्हेंबर 2020 रोजी  तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे तहसिलदार विजय पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले , शासकीय सदस्य व कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडली .

सभेमध्ये एकूण 88 अर्जाची छाननी करण्यात आली.  यामध्ये संजय गांधी योजनेचे  60   प्राप्त अर्जापैकी  53    मंजूर तर   07 अर्ज नामंजूर करण्यात आले.  श्रावणबाळ योजनेचे 26 प्राप्त अर्जापैकी  20 अर्ज मंजूर तर 06 अर्ज नामंजूर करण्यात आले. राष्ट्रीय कुटूंब योजनेचे 02 प्राप्त अर्जापैकी 02 अर्ज मंजूर करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News