सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक व्हावी.. सीबीआयमार्फत हत्याकांडाचा चौकशी करावी..रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी


सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक व्हावी.. सीबीआयमार्फत हत्याकांडाचा चौकशी करावी..रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीची मागणी

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देताना महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बडेकर, अनिता आंग्रे, अलका लोंढे, अर्पिता बडेकर, सुनिता घोडके आदि. (छाया-वाजिद शेख-नगर)

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बडेकर, अनिता आंग्रे, अलका लोंढे, अर्पिता बडेकर, सुनिता घोडके आदि उपस्थित होते. असले तरी त्या असुरक्षित आहेत. महिलांना शासनाच्या नियमाप्रमाणे सबलीकरण करणे योग्य वाटत असेल तर यापुढे समाजकारण करणार्‍या महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवानगी देण्याची गरज आहे. याद्वरे महिला आपले संरक्षण स्वतः करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.    

तसेच आरपीआय महिला आघाडीच्या वतीने पोलीसांनी रेखा जरे हत्याप्रकरणात चोवीस तासात मारेकर्‍यांना अटक केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. या हत्याकांडचा उलगडा होण्यासाठी जरे यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावे, जेणेकरून पोलीस प्रशासनाला सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा योग्य तपास करता येईल. ज्या दिवशी जरे यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे वेळोवेळी लोकेशन कोण घेत होते? त्याचीही कसून चौकशी करण्यात यावी, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार यांना लवकरात लवकर अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर प्रकरणाची तात्काळ सीबीआयमार्फत चौकशी करावी व महिलांचे संरक्षण होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News