चांदेकसारे गावचे सुपुत्र प्रा.डॉ. धर्माजी खरात यांची एस.एन डि. टी विद्यापीठाचे पि,एच डी गाईड म्हणून नियुक्त !!


चांदेकसारे गावचे सुपुत्र प्रा.डॉ. धर्माजी खरात यांची एस.एन डि. टी विद्यापीठाचे पि,एच डी गाईड म्हणून नियुक्त !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

चांदेकसारे -शून्यातून विश्व निर्माण कसे करतात,त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच डॉ. धर्माजी खरात.नुकत्याच झालेल्या विद्यापीठ रिसर्च रिक्युर्मेंट कमिटीने (इंग्रजी भाषा व वाड्मय या विषयाचे पी.एच.डी मार्गदर्शक म्हणून महिला विद्यापीठ,मुंबई यांनी डॉ. खरात यांना मान्यता दिली,

 त्यामुळे डॉ. खरात यांच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या यशाबद्दल डॉ. खरात यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.   कोपरगांव तालुक्यातील चांदेकसारे गांवचे सौ.बबुताई आणि श्री. एकनाथ खरात यांचे ते सुपुत्र आहेत.अतिशय प्रतिकूल परिस्थितित त्यांनी त्यांचे प्राथमिक पासून ते उच्च शिक्षण पूर्ण केले.मुंबई येथील SNDT महिला विद्यापीठात जुलै २००३  पासून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत.  आपली परिस्थिती आपणच बदलू शकतो,यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि त्यानुसार त्यांनी निश्चय आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षणासह इतरही क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.  ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचा प्राध्यापक होण्याची स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते पूर्णही केले.मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या हजारों विद्यार्थ्यांसाठी डॉ.खरात हे प्रेरणास्रोत असतील.  माणूस जन्माने नाही तर कर्तूत्वाने उत्तुंग भरारी घेऊ शकतो हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.ते डॉ. खरात यांच्या प्रवासाने चटकन लक्षात येईल.  

याशिवाय डॉ.धर्माजी खरात हे विद्यापीठ शिक्षकांनी निवडून दिलेले एस.एन.डी. टी.विद्यापीठ चे सिनेट सदस्य आहेत.डॉ. खरात हे या विद्यापीठ इंग्रजी अभ्यास मंडळाचे ही सदस्य आहेत.तसेच ते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थातच बालभारती या नामांकित संस्थेच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.  उच्च माध्यमिक अकरावी व बारावी कुमारभारती इंग्रजी पाठ्यपुस्तक निर्मिती लेखक समूहातील एक लेखक म्हणून परिचित आहेत.याशिवाय मराठी माध्यमातून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची इंग्रजी अधिक समजण्या सुखकर व्हावी याकरिता रेमिडिअल इंग्रजी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.  तसेच त्यांचे बिजनेस कम्युनिकेशन- थेअरी अॅण्ड प्रॅक्टीसेस हे पुस्तक नावाजलेले आहे.मी महाराष्ट्राचा- चारोळीतून आरोळी हा पहिला काव्यसंग्रह मनसे प्रमुख श्रीमान राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित आहे.प्राचार्य डॉ. श्री. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना असलेला काव्यसंग्रह संवेदना ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणाताई ढेरे यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे.त्यांचा उणीवा-जाणीवा हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.  अनेक दिवाळी अंकातून त्यांचे लिखाण प्रकाशित होते आहे.डॉ. खरात यांचे अनेक संशोधनपर प्रबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल मधून प्रकाशित आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेबिनारला डॉ. खरात यांनी संबोधित केले आहे. उत्तम वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे.   

थोडक्यात, डॉ. धर्माजी खरात हे नव्या युगातील झुंझार योध्दा आहेत. प्राध्यापक, संशोधक, कवी, लेखक, संशोधक मार्गदर्शक,आणि सिनेट अशी अनेक विशेषण डॉ.धर्माजी खरात यांच्या नावाच्या अगोदर लावता येतील. असे असले तरी, डॉ. खरात एक समाजकारणी आहेत, आपल्या परिने शक्यतोपरि मदत ते सर्वांना करत असतात.  या उत्तुंग व्यक्तिमत्वाला  विद्यापीठाची इंग्रजी विषयाची पी.एच.डी गाईडशिप मिळाल्याबद्दल नागरीकांनी आभाळभर शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News