राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर करा !! आ. आशुतोष काळे


राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर करा !! आ. आशुतोष काळे

सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) हा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करून मतदार संघातील रस्ते व पूल बांधणीसाठी निधी द्या अशा आशयाचे निवेदन मंत्री नामदार नितीन गडकरी यांना देतांना आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव मतदारसंघातील रस्ते व पूल बांधण्यासाठी निधी द्या_ आमदार आशुतोष काळे

 कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या मार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद झालेली नाही.त्यासाठी या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करावे व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते व पूल बांधणीसाठी निधी द्यावा अशा आशयाचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांना दिले आहे.

         कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून सावळीविहीर फाटा ते कोपरगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत या मार्गाची दुरावस्था होऊन अनेक ठिकाणी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मतदार संघातील खराब झालेले रस्ते व सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत आमदार आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांना खराब झालेल्या रस्त्यांची माहिती देवून सविस्तर चर्चा केली.सिन्नर,शिर्डी,अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील सावळीविहीर फाटा ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ जी असा क्रमांक देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.१६० साठी निधीची तरतूद करण्यात आली आहे मात्र (राष्ट्रीय महामार्ग) एन.एच.७५२ चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे  हस्तांतरण झालेले नसल्यामुळे या मार्गासाठी निधीची तरतूद झालेलीं नाही.

           कोपरगाव तालुक्याच्या शेजारीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान आहे. त्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मतदार संघातील नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांना देखील या खराब रस्त्यामुळे मनस्ताप होत आहे. यावर्षी व मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मतदार संघातील अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली असून अनेक रस्त्यावरील पूल धोकादायक झाले आहेत त्यामुळे भविष्यात याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या एन.एच. ७५२ जी महामार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करावे व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते व पूल बांधणीसाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

           

जाहिरात
Search
विडिओ
Recent News