मॉल संस्कृतीला ग्रामीण भागातील छोटे विक्रेते करणार विरोध!!


मॉल संस्कृतीला ग्रामीण भागातील छोटे विक्रेते करणार विरोध!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.   

कोपरगाव -गेली अनेक वर्षे केवळ महानगरांमध्ये कार्यरत असेलेली मॉल संस्कृतीने आता ग्रामीण भागात देखील आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे या कंपन्यांनी भारताची किरकोळ  बाजारपेठ गिळंकृत करण्याची वाटचाल चालू सुरू केली असुन या वाटचालीस  किरकोळ विक्रेते प्रखर विरोध करणार असल्याची भूमिका कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अहमदनगर जिल्ह्यातील संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आली. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे हे या बैठकीचे अध्यक्ष स्थानी होते.

या प्रसंगी बोलताना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले कि यापूर्वी १० लाखांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या शहरात असे मॉल सुरु करण्याची परवानगी होती.हे मॉल आता ग्रामीण भागात देखील सुरु झाल्याने किरकोळ विक्रेत्यांचा  उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. प्रचंड भांडवल क्षमता व मोठ्या प्रमाणात खरेदी तसेच जाहिरातीवर प्रचंड खर्च यामुळे या कंपन्यांशी स्पर्धा करणे किरकोळ विक्रेत्यांना अवघड झाले आहे.

या पार्श्वभूभीवर महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी एकजूट करून या कंपन्याच्या ग्रामीण भागातील प्रवेशाला विरोध केला पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या बैठकीत कोपरगाव भारतीय जनता पक्षाचे व व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सर्वश्री.नारायणशेठ अग्रवाल, केशवजी भवर, सत्येन मुंदडा,नगरसेवक मंदार पहाडे, नरेंद्र कुर्लेकर, राम थोरे, किरण शिरोडे  यांनीही विचार व्यक्त केले.

या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी प्रमुख संगमनेरचे शिरीष मुळे हे उपस्थित होते. ते सदर प्रसंगी बोलताना  म्हणाले कि, "भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या निदर्शनास पक्ष पातळीवर हि बाब निदर्शनास आणून देऊन,छोट्या व्यापाऱ्यांचे रक्षण करण्यात भारतीय जनता पक्ष पुढाकार घेईन. या बैठकीत कोपरगाव तालुका  व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल, केशवराव भवर तसेच शिर्डी व्यापारी संघटना प्रमुख श्री.लोढा, राहाता येथील चुग, धाडीवाल, कोपरगाव तालुका व्यापारी संघर्ष समितीचे अकबरभाई शेख यांनी या मॉल संस्कृतीतीस कडाडून विरोध करण्याचे आवाहन केले. या बैठकीस संगमनेर, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, बेलापूर या भागातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News