भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम समाधानकारक -श्रीकांत मायकलवार


भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम समाधानकारक -श्रीकांत मायकलवार

नगर - (प्रतिनिधी संजय सावंत) एखाद्या शहराची ओळख तेथील सोयी-सुविधा, रचनात्मक कामे, स्वच्छता, सुशोभिकरणाबरोबरच तेथील धार्मिक स्थळांमुळे शहराच्या वैभवात भर पडत असते. नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेश मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचा झालेला जिर्णोद्धार हा कौतुकास्पद असाच आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मंदिर बंद होती आता ती सुरु झाली आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांची व्यवस्था व सुविधांही चांगल्या पद्धतीची असणे गरजचे आहे. श्रीविशाल गणेश मंदिराच्यावतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम समाधानकारक आहेत, असे प्रतिपादन मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी भेट दिली असता,  त्यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त रंगनाथ फुलसौंदर, पांडूरंग नन्नवरे, श्यामराव व्यवहारे, प्रा.सुजित बेडेकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी पंडितराव खरपुडे  यांनी मंदिराच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबरच मंदिरे खुली झाल्यानंतर शासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे, त्याच बरोबर भाविकांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंगच्या सूचना देऊन त्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. 

    देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे यांनी आयुक्त मायकलवार यांना मंदिराचा झालेल्या जिर्णोद्धाराच्या  कामाची माहिती दिली. यावेळी देवस्थानाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News