भिगवण रोटरी क्लबच्या वतीने फळझाडे वाटप


भिगवण रोटरी क्लबच्या वतीने फळझाडे वाटप

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131 च्या  पंचम  प्रोजेक्टच्या  माध्यमातून भिगवण रोटरी क्लबच्या वतीने 125 शेतकऱ्यांना प्रत्येकी 13 प्रमाणे 1625 फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली यामध्ये आंबा,नारळ,चिक्कू,पेरु,बोर,सिताफळ,रामफळ,मोंसंबी,लिंबू,बांबू,कडीपत्ता,जांभुळ,चिंच ही झाडे होती, मदनवाडी येथे घेण्यात आलेल्या  कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या DG रश्मी कुलकर्णी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना म्हणाल्या की भिगवण रोटरी क्लबने अनेक चांगले सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्यामध्ये पाणी,वृक्ष लागवड, विशेष करून कोविड सेंटरसाठी 50 बेड देऊन कोरोना रूग्णांसाठी मदत केली आहे.येणाऱ्या काळात भिगवण रोटरी क्लबला भरीव मदत करणार आहे.या कार्यक्रमात मीनाताई बोराटे,सुदीन आपटे,भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने,सरपंच आम्रपाली बंडगर, भिगवण रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर,

सचिन बोगावत, रियाज शेख,रंगनाथ देवकाते आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन रणजीत भोंगळे यांनी केले आभार संतोष सवाने यांनी मानले या कार्यक्रमासाठी  तेजस देवकाते  उपसरपंच मदनवाडी , राजेंद्र देवकाते , रणजीत निकम , लालासो कुंभार, धनाजी थोरात, प्रल्हाद देवकाते,विष्णू देवकाते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेक्रेटरी दिपाली भोंगळे, खजिनदार वैशाली बोगावत, संजय खाडे,औदुंबर हुलगे,डॉ.अमोल खानावरे,प्रवीण वाघ,संजय रायसोनी, कमलेश गांधी, प्रदीप वाकसे, प्रदीप ताटे ,पप्पू भोंग यांनी विशेष प्रयत्न केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News