यवत पोलीस स्टेशन हद्दीत विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह,ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन


यवत पोलीस स्टेशन हद्दीत विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह,ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :दौंड तालुक्यातील यवत येथील कासुर्डी गावच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस नाईक गणेश पोटे यांनी दिली आहे, 1/12/20 रोजी सकाळी 11:30 वाजता  कसूर्डी गावच्या हद्दीत मुळा मुठा कॅनॉलच्या कडेला असलेल्या गणेश आखाडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये अंदाजे 25 ते 30  वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला आहे,त्यांच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगांची पॅन्ट आहे,त्याच्या खिशामध्ये मोबाईल ची काळ्या रंगाची पॉवर बँक असून पाकीट मध्ये हा फोटो सापडला आहे,तरी या व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील 9823242999,सहायक पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे 9404969005,पोलीस नाईक गणेश पोटे 9923892525 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल,पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News