शेवगाव खामगाव रस्ता 90 लक्ष गेले पाण्यात खड्डे वर रस्ता खाली सां बा विभागाची अजब कामगिरी


शेवगाव खामगाव रस्ता 90 लक्ष गेले पाण्यात  खड्डे वर रस्ता खाली  सां बा विभागाची अजब कामगिरी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव खामगाव हा 90 लक्ष रुपयांचा रोड ला रुपयांचा रोड गेली चार-पाच वर्ष पर्वी  मंजूर झाला होता, त्याचे टेंडर ही झाली व नंतर त्याचे काम हीआहे नगरच्या काही ठेकेदारांकडून करण्यात आले, परंतु सदरील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने, खड्डे वर आले व रस्ता खाली गेला अशी परिस्थिती आज त्या रस्त्याची पहावयास मिळत आहे, त्यामुळे सदरील रस्त्यावर आज अनेक अपघात दररोज होताना पाहावयास मिळत आहे, त्यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे, तर काहींना त्यामुळे अपंगत्व आले आहे मात्र सदरील रस्त्याकडे कुठल्याही अधिकाऱ्याने व कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने वेळीच लक्ष न दिल्यामुळे आज प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे,

              त्यामुळे शासनाचे 90 लक्ष रुपये पाण्यात गेलेले आज तरी दिसत आहे, यामध्ये अधिकारी व पदाधिकारी यांनी संगनमताने अपहार केलेला दिसत आहे, मात्र यामध्ये सामान्य माणूस मात्र आपला जीव गमावता दिसत आहे,आज रस्त्याकडे पाहिले तर अक्षरशः रस्त्याची चालवून खड्डे वर आलेले दिसत आहेत व रस्ता खाली फूटभर गेलेला दिसत आहे, यामुळे अभियंत्याच्या कामाच्या क्षमतेवर सामान्य माणसाला होताना प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे, मोठाल्या परीक्षा देऊन हे अधिकारी बनतात, परंतु रस्त्याच्या कामांबाबतयांचा अभ्यास कमी पडतो कुठे असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य विचारू लागले आहेत, रस्त्याच्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला देताना कोणते नियम व निकष लावले जातात व हे मोठाले बिले काढली जातात, बिले काढताना मात्र अभियंत्यांचा अभ्यास कुठे कमी पडतो, त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना रोडकडे पाहण्याला सवड मिळत नाही का ? या त्यांच्या मुजोरी मुळे ठेकेदार आज पूर्णपणे मोकाट झालेले आहेत, त्यामुळे शेवगाव शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची आज अक्षरशः चाळणी झालेली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवर सर्वसामान्य माणसाला संशय निर्माण झालेला आहे,


ज्यावेळी रस्त्याचे काम चालू असते त्यावेळेस अधिकारी मात्र त्या कामाकडे जाणीवपूर्वक फिरताना दिसत नाहीत, हे कोडे मात्र सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत उलगडले नाही, यामागे काही आर्थिक तडजोड तर नसते ना ? का टक्केवारीचा विषय येतो, कारण आज टक्केवारी संस्कृती ही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बोकाळलेली पहावयास मिळत आहे,

आज शेवगाव शहराला मिळणाऱ्या सर्व रस्त्यांची चाळणी झालेली दिसत आहे, परंतु शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे ह्या गप्प का आहेत,? त्यांना दररोज होत असलेल्या अपघातांची व त्यामध्ये मृत पावत असलेल्या आकड्यांची माहिती नाही का, आमदार गप्प बसणे ही तालुक्यासाठी धोक्याची घंटा तर नाही ना ?

जाहिरात
Search
विडिओ
Recent News