स्वबळावर लढणार, उस दराच्या आंदोलनासाठी तयार रहा, प्रदेशअध्यक्ष संदिप जगताप


स्वबळावर लढणार,  उस दराच्या आंदोलनासाठी तयार रहा, प्रदेशअध्यक्ष संदिप जगताप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना 

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आज शेवगाव मधील शुभम मंगल कार्यालय येथे पार पडला, यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले की,शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असून त्यासाठी पक्षाध्यक्ष राजू शेट्टीही शेवगाव मध्ये येणार आहेत,व पूर्ण ताकतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये उतरणार आहे असे जगताप म्हणाले, नगरपरिषदेच्या 21 प्रभागांमध्ये स्वाभिमानी संघटना स्वतंत्र पणे उमेदवार उभे करणार,असेही ते यावेळी म्हणाले,

    यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे, पक्ष जिल्हाध्यक्ष राऊसाहेब लवांडे,जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग सुनील लोंढे,उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे,जिल्हा कार्याध्यक्ष दादा पाचरणे,महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे,बाईजाबाई बटूळे,रमेश कचरे,पक्ष तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड, संघटना तालुकाध्यक्ष प्रवीण म्हस्के, मेजर अशोक भोसले,अमोल देवढे,दत्ता फुंदे,शहराध्यक्ष भाऊ बैरागी,संदीप मोटकर,रावसाहेब मगर आदि मान्यवर उपस्थित होते,

 यावेळी तालुक्यातील विविध शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, दुपारी दोन वाजता कार्यक्रम सुरू झाला,विविध मान्यवरांचे सत्कार होऊन या कार्यक्रमाला सुरुवात झाली, यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी बोलताना म्हटले की,साखर कारखान्यांनी दर दर कमी दिला तर खपवून घेतले जाणार नाही,येत्या भविष्यकाळात मोठे आंदोलन साखर कारखान्यांवर उभे करू असे त्यांनी यावेळी बोलताना संगीतले,  यावेळी दीपक ढाकणे,भैया राऊत,सरोज इनामदार, निलेश गटकळ,मच्छिंद्र गोरडे, दीपक झिरपे,अंबादास भागवत,रमाकांत काळे,शुभम काळे,प्रतिभा तांबे, सचिन भोसले, तुषार शिंदे आदिंनी पक्षामध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भराट तर आभार रावसाहेब लवांडे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News