भारतीय पेहरावात साई बाबांचे दर्शन घ्यावे,भारतीय संस्कृतीचे पालन गरजेचे, भक्ताना विंनती, ड्रेस कोड बाबत सक्ती नाही... कान्हूराज बगाटे


भारतीय पेहरावात साई बाबांचे दर्शन घ्यावे,भारतीय संस्कृतीचे पालन गरजेचे, भक्ताना विंनती, ड्रेस कोड बाबत सक्ती नाही... कान्हूराज बगाटे

शिर्डी :  राजेंद्र दूनबळे ,प्रतिनिधी

देशात कोरोना या आजाराने धुमाकूळ घातल्याने राज्य शासनाच्या नियम नुसार मंदिरे काही अटी ,शर्ती घालून उधडे करण्यात आले, कोरोना व्हायरसच्या  पार्श्वभूमीवर बऱ्याच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मंदिरं खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत मंदिरं खुली झाल्याने भाविकांनी गर्दी केली. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठीसुद्धा देश- विदेशातून भाविक येत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. पण, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावं अशी विंनती मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तूर्तास सक्ती करण्यात आलेली नसली तरीही त्यासंबंधीचे फलक मात्र येथे लावण्यात आले आहेत. तीन भाषांमध्ये हे फलक लावण्यात आले असून, भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीपर मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे. 

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी काहीजण हे तोकड्या कपड्यांमध्ये असल्याचं मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आलंय किंबहुना यापैकी काही भाविकांना सांगून त्यांना भारतीय पेहरावासाठीची विनंतीही करण्यात आली. या निर्णयाचं काही भाविकांनी स्वागत केलं.तर काही भक्तात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News