कुष्ठरूग्ण व क्षयरूग्ण शोध मोहिम योजनेस सुरूवात


कुष्ठरूग्ण व क्षयरूग्ण शोध मोहिम योजनेस सुरूवात

प्रतिनिधी-भालचंद्र महाडिक

बारामती, दि.01:- कुष्ठरूग्ण व क्षयरूग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत संयुक्त सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहिम व कृष्ठरूग्ण शोध अभियान राज्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.समाजातील सर्व क्षयरूग्ण व कुष्ठरूग्णांचा शोध घेऊन निदान निश्चिती नंतर औषधोपचार सुरू करणे अंत्यत महत्वाचे आहे. रोगशास्त्रीय अहवालानुसार वरील दोन्ही आजारांचे रूग्ण निदान व औषधोपचारापासून  वंचित राहिल्यास रूग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो तसेच त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे सदरचे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आशा, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. 1 डिसेंबर 2020 रोजी तालुकास्तरीय कुष्ठरूग्ण व क्षयरोग शोध मोहिम योजनेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी सुनिल जगताप,  तालुका सुपरवायझर बाळासाहेब दळवी, महादेव मोहिते, एस.ए.खान तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. बारामती तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी डॉ. मनोज खोमणे यांनी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News