माध्यमिक शिक्षक बॅंकेच्या कर्जाचा व्याजदर लवकरच कमी करणार संचालक -वाल्मिक बोठे


माध्यमिक शिक्षक बॅंकेच्या कर्जाचा व्याजदर लवकरच कमी करणार  संचालक -वाल्मिक बोठे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी                                                                              कोपरगाव -माध्यमिक शिक्षक बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी चांगदेव खेमनर तर  वाल्मिक बोठे यांची संचालक पदि निवड झाली असून त्यांचा सत्कार कोपरगांव तालुक्यातील बँकेच्या सर्व शिक्षक सभासदांकडून करण्यात आला.यावेळी कोपरगांव येथील सभासद श्री गिरमकर सर यांनी मान्यवरांचे स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले.संचालक श्री कैलास रहाणे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले आम्ही सर्व संचालक सभासदांना येणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यास सदैव कटिबद्ध आहोत हि संस्था जिल्ह्य़ातील शिक्षकांची कामधेनू आहे. तिची जपणूक व जोपासना करणे हे काम संचालक व सभासद दोघांचेही आहे. मा चेअरमन चांगदेव खेमनर यांनी आपल्या मनोगतात कोपरगांव येथील सभासदांकडून आम्हाला खूपच सहकार्य लाभले आहेत त्यामुळेच कोपरगाव येथील सभासदांकडून मतदान जास्त झाले आहे. यावेळी नवनिर्वाचित संचालक वाल्मिक बोठे सर म्हणाले की आपली संस्था पुरोगामी सहकार मंडळाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते मा चेअरमन व संचालक प्रा.श्री भाऊसाहेब पा कचरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथदर्शी व पारदर्शी पणे कार्यरत आहे. संस्थेचे एकूण 11500 सभासद असून आजपर्यंत एकूण 615 कोटि  रूपयाच्या ऐच्छिक ठेवी आहेत तसेच 713  कोटी इतके कर्जवाटप करण्यात आले आहे.संस्थेचे मुख्य कार्यालय अहमदनगर येथे असुन एकूण बारा शाखा आहेत. आपण बँकेमार्फत एका सभासदाला एकूण सतरा लाख रूपये कर्ज फक्त साडेआठ टक्के इतक्या कमी व्याजदराने त्वरीत मंजूर करतो. तसेच आपण भविष्यात कर्जाचा व्याजदर अजूनही कमी करणार आहोत तसेच मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांच्या जमा शेअर्स रकमा आपण वारसांना परत करतो. सभासदाच्या एका मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहाकरीता संस्थेच्या पुरोगामी कन्यादान व भाग्यलक्ष्मी योजनेंतर्गत रूपये पंधरा हजार इतकी रक्कम विनापरतावा देण्यात येते तसेच देशसेवेचेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाल्यास आपल्या जिल्ह्य़ातील शहिद जवानाच्या कुटुंबियांना रूपये 51000 इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणुन देण्यात येते अशा अनेक योजनांची माहिती दिली. सत्कार समारंभ आटोपून मा चेअरमन व संचालक यानी कोपरगांव शाखेत भेट दिली त्यावेळी त्यावेळी कोपरगांव शाखेच्या वतीने शाखाधिकारी नितीन होन व सहकारी सागर सातपुते यांनी चेअरमन व संचालक यांचा सत्कार केला त्यानंतर मा चेअरमन व संचालक यांनी शाखेतील दैनंदिन कामकाज व सभासदांच्या अडीअडचणी यांची माहिती शाखाधिकारी नितीन होन यांचेकडून जाणून घेतली घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक बुधवंत यांनी केले तर श्री नारायण डुकरे  यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी संचालक कैलास रहाणे,सर बाळासाहेब सोनवणे,अरूण पवार,म्हासाळ सर,मच्छिंद्र गाडेकर, भरत रुईकर, विजय देशमुख, भास्कर गुरसळ, गंगाधर केरे, गोकुळ जपे, दिपक बुधवंत, कान्हू गिरमकर, अशोकराव वारूळे, दिलीप तुपसैदर, विलास आवारी, अतुल कोताडे, दिलीप देवकर, कैलास सातपुते, वाल्मिक काकडे, शरद गागरे, नारायण डुकरे,मच्छिंद्र पाचोरे, राजेंद्र वानखडे, अनिल गवळी, संदिप जगझाप, चंद्रकांत शेजवळ, राजेंद्र देशमुख, महेंद्र खंडवे, भाऊसाहेब चंदनशिव इत्यादि सभासद उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News