आवडुदादा मिसाळ याचं सहामासी श्राद्धविधी


आवडुदादा मिसाळ याचं सहामासी श्राद्धविधी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण     

           जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जावच लागणार हें ठरलेलं आहे. परंतु गेल्यावरही जगता येते अशी व्यवस्था मात्र येथे आहे. त्या पद्धतीचे जीवन जगणाऱ्यांचे अनेकाचे दाखल आपल्यासमोर आहेत. पुराणातही आणि आजकालच्या आनेक सामाजिक बांधिलकी सांभाळुन जीवन व्यथीत करणाऱ्या व्यक्ती मरणानंतरही त्यांच्या कार्यानी त्या जीवन जगतच असतात. अशाचएका पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव येथील एक ढाण्या वाघ सहा महिन्यापुर्वीच काळाच्या पडद्याआड गेला. मनाने हाळवा पण 

कठोर निर्णयाचा शिलेदार असणाऱ्या, स्मितभाषी, प्रेमळ नातेगोते जोपसणारा, कट्टर हिंदुत्ववादाची खुन गाठ उरी बाळगणारा, समृध्द शेतकरी कुटुबांचा वारसा चालवणारा व मुली लाच मुलगा मानुन आपल्या संसाराची नौका पार करायला निघालेला ढाण्या वाघाने सहा महिन्यापुर्वीच आपला निरोप घेतला. आनेकाच्या पापण्याआड दडलेल्या पाण्यावर विश्वास ठेवुन आनेकांनी आपल्या लाडक्याला आसवांची वाट मोकळी करून दिली.

               वडील धोंडीराम मिसाळ यांच्याकडून समाजसेवा व माणसावर प्रेम करणं वेळप्रसंगी कठोर भुमीका घेणं या गोष्टीचं बाळकडु मिळालेल्या आवडु धोंडीराम मिसाळ यांनी नाते गोत्यांची वेल मात्र घट्ट विणली. सामान्य माणसांच्या मनात घर करत जीवन जगण्यांत त्यांनी धन्यता मानली अनेक संकटांना समोरे जाऊन धैर्य हिंमत सचोटी या सर्व गोष्टी जीवन जगताना किती महत्वाच्या असतात ह्या त्यांच्या जीवनात महत्वाची मार्गदर्शक नितीमुल्य आजही मार्गदर्शकच आहेत. राजकारण समाज उपयोगी ठरावं हि मुळ धारणा त्यांच्या मनात घर करून होती. त्याच धरतीवर त्याचे जीवन जगताना आनेकांनी आनुभवले आहे. सत्यासाठी झुंज देणारा म्हणुन अनेक प्रसंग त्यांचे जीवनातील रंग हे छटा बदलतानाचे साक्षीदार आजही आनेक आहेत त्यातही समाजाला पोषण ठरणारी जीवन मुल्य असतात ठरतात. 

            आपल्या हळव्या मनाने सहज दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कठोर निर्णयने इतरांना मात्र ज्ञानाच्या कक्षा रूदाव्या लागतील. जीवन जगण्याच्या आनेक संकल्पना विचार आनेक तत्वव्यक्ती धर्मग्रंथातुन संताकडुन समाजसेवकाकडुन आईवडीलांकडुन आपल्या आवती भोवतीच्या पारिस्थितीवरून या मिळत असतात. त्या जीवनात उतरुण जीवनात जीवन घडवण्यात त्यांचा प्रभाव हा कसा उभा करता येईल या कडे कधी कानाडोळा न करणाऱ्या त्याच्या जीवनातील नितीमुल्यांवरुन  अधोरेखीत होतात. अशा माणसाविषयी डोळयातील पाण्याचे मोत्यात रुपांतर होईपर्यत रडावे तेवढे थोडेच आहे. मात्र त्यांची जीवनपद्धती हि दिशादर्शकतेची अनुभूती हि प्रेरणादायी आहे. गावच्या खालपासुन ते वरच्या राजकारणापर्यतचे आनेक बारकावे त्यांनी त्यांच्या बुध्दीचातुर्या वर सहज सोडून राजकिय मंडळीच्या मनातही मोठी जागा निर्माण केली. भाऊ, बहीणी,मुलगी,जावई, व्याही, नातवडे, पुतणे, सुना, नातवं, असा मोठया परिवारातील दादाचं अकाली जाणं . हे मनाला हुरहुर लावणारं ठरलं त्यांच्या २ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या सहा मासी श्राद्ध प्रसंगी त्यांना शब्दरूप दोन पुष्प...

असं एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आठवणीचा महापुर व समाजसेेवेची झुळुक देवुण जातात. देशात महामारी कोरोनाचे संकट असतानाही सामाजिक, धार्मिक, राजकिय, व नाते गोत्यांच्या माणसांनी मिसाळ कुटुबांचे सांत्वन करून मन हालकी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News