विधाते परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरास 51 हजारांची देणगी


विधाते परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरास 51 हजारांची देणगी

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानास 51 हजारांचे देणगी देण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर,  पंडितराव खरपुडे, अशोकराव कानडे, पांडूरंग नन्नवरे, रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, अमित खामकर, संतोष मेहेत्रे, सौ.वसुंधरा विधाते, सीए अभिजित विधाते, डॉ.सौ.प्रियंका विधाते-चौरे, कु.निधी चौरे आदि.(छाया : राजु खरपुडे)

श्री विशाल गणेश मंदिराची किर्ती राज्यभर होत आहे - प्रा.माणिकराव विधाते

नगर (प्रतिनिधी संजय सावंत) - श्री विशाल गणेश मंदिर हे शहराचे ग्रामदैवत आहे, त्यामुळे या श्रीगणेशावर अनेकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा श्रीविशाल म्हणून ख्याती आहे. आमच्या परिवाराचीही मोठी श्रद्धा श्री विशाल गणेशावर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार काम उत्कृष्टपणे झाल्याने मंदिराच्या लौकिकात मोठी भर पडलेली आहे. या मंदिराची किर्ती राज्यभर होत आहे. मंदिराच्या कार्यात आपलेही योगदान असावे, या उद्देशाने आपण देणगी दिली आहे. श्री विशाल गणेश हा विघ्नहर्ता असल्याने लवकरच तो कोरोनाचे संकट दूर करेल व सर्वत्र सुख-शांती नांदेल, अशा सदिच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांचे चिरंजीव सीए अभिजित विधाते व नात कु.निधी चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानास 51 हजारांचे देणगी देण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, अशोकराव कानडे, पांडूरंग नन्नवरे, रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, अमित खामकर, संतोष मेहेत्रे, सौ.वसुंधरा विधाते, डॉ.सौ.प्रियंका विधाते-चौरे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. शासनाच्या निर्णयानुसार आता मंदिरे उघडली आहेत. भाविक नित्यनियमाने दर्शनासाठी येत आहेत. देवस्थानच्यावतीने भाविकांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे.सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर या गोष्टींची विशेष काळजी घेण्यात येत आहे. आज भाविक प्रा.माणिकराव विधाते परिवाराने देवस्थानला देणगी देऊन मंदिर कार्यास हातभार लावला आहे, याबद्दल त्यांचे आभार मानून देवस्थानच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम नियोजनानुसार सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.   यावेळी अशोकराव कानडे यांनी विधाते परिवारातील सदस्यांचा यथोचित सत्कार केला. सूत्रसंचालन  पंडितराव खरपुडे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News