चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पो.नि. राकेश मानगावकर यांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान


चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने  पो.नि. राकेश मानगावकर यांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे पो.नि. राकेश मानगावकर यांचा चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन येथे मानगावकर यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष नवनाथ बोरुडे, युुवा उपाध्यक्ष विकी कबाडे, रविदासीया प्रितम देसाई आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटकाळात कोपारगाव येथे कार्यरत असताना पो.नि. मानगावकर यांनी उत्तमपणे कर्तव्य बजावून अनेक गरजूंना मदत केली. अनेक वंचित घटकांना त्यांनी आधार देण्याचे कार्य केले. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उत्तमपणे उपाययोजना करुन कार्य केले. या कार्याची दखल घेत त्यांना कोरोनायोध्दा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी सांगितले. मानगावर यांनी कर्तव्य पार पाडून सर्वसामान्यांसाठी सेवा केली असून, हा सन्मान प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारीचा असल्याची भावना व्यक्त केली. कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे पो.नि. राकेश मानगावकर यांचा चर्मकार विकास संघ व लोकनेते सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करताना चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर समवेत प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष नवनाथ बोरुडे, युुवा उपाध्यक्ष विकी कबाडे, रविदासीया प्रितम देसाई.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News