कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साहेब यांचा शिवसेना संघटनांच्या वतीने सत्कार !! .


कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साहेब यांचा शिवसेना संघटनांच्या वतीने सत्कार !! .

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

आज रविवार दि २९ नोहेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नवनियुक्त व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साहेब यांचा कोपरगाव शहर शिवसेना युवासेना ग्राहक संरक्षण कक्ष व भारतीय विद्यार्थीसेना यांच्या वतीने सत्कार करून भावी वाटचालीस शूभेच्छा देण्यात आल्या

  कोपरगाव शहरातील गुन्हेगारांवर तुमचा दबदबा राहू द्या व शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रसार होत असुन त्यावर आळा घालण्यासाठी नागरीकांना मास्क वापरण्याची सक्ती करावी जेणे करून कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होइल अशी विनंती कोपरगाव शिवसेनेच्या वतीने गवळीसाहेबांना करण्यात आली.

याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष योगेश बागुल,शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव मा.शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ,कक्ष शहरप्रमुख रवींद्र कथले, युवासेना शहरप्रमुख नितीश बोरुडे युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके, शिवसेना उपशहरप्रमुख कुणाल लोणारी,अमोल शेलार, उपशहर संघटक सागर फडे, वसीम चोपदार,आशिष निकुंभ, विजय भोकरे,पप्पू पडियार, रंजन जाधव,गणेश घुगे आदी शिवसैनिक,युवासैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News