विश्वहिंदू परिषदेतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन!! महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आदर्श तरुणांना प्रेरणादायी- गजेंद्र सोनवणे


विश्वहिंदू परिषदेतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन!!  महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आदर्श तरुणांना प्रेरणादायी- गजेंद्र सोनवणे

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याचा आदर्श तरुणांना प्रेरणादायी असा आहे.तळागाळातील अज्ञान समाजाला अंधकारातून प्रकाशाचा मार्ग महात्मा फुले यांनी दाखविला आहे.समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करून समाजाला उभे करण्याचे व स्त्री शिक्षणास प्राधान्य देऊन अधोगतीस गेलेल्या समाजाला ज्ञानदानाच्या कार्यातून पुढे नेण्याचे थोर कार्य महात्मा फुले यांनी केले. महात्मा फुले यांचे कार्य व विचार येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक असे आहे.असे प्रतिपादन विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले.                                                                थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त नगर जिल्हा विश्वहिंदू परिषदे तर्फे माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठमंदिर संपर्क समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे,बजरंगदलाचे जिल्हा अध्यक्ष गौतम कराळे,राजेंद्र चुंबळकर,विष्णू कुलकर्णी,गोकुळ शिंदे आदी उपस्थित होते.                                  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News