राज्यात आदर्श निर्माण होईल असे पत्रकार संघाचे कार्य - डॉ.लक्ष्मणराव आसबे


राज्यात आदर्श निर्माण होईल असे पत्रकार संघाचे कार्य -  डॉ.लक्ष्मणराव आसबे

भिगवण (प्रतिनिधी):- नानासाहेब मारकड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका या पत्रकार संघाच्या माध्यमातून अविरत समाजकार्य व उपेक्षितांना न्याय देण्याची वार्तांकनातून, भूमिका,त्या जोडीला बावीस हजार वृक्ष लागवडीचा संकल्प,यामुळे राज्यात आदर्श निर्माण होईल असे काम पत्रकार संघाने सुरू केले आहे.असे गौरवोद्गार कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मणराव आसबे यांनी काढले.

      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने 22000 हजार वृक्ष लागवडीचा संकल्पाअंतर्गत इंदापूर तालुक्यातील पळसदेव शेलार पट्टा येथे (शनिवार ता.28 रोजी) वृक्ष लागवड सार्वजनिक बांधकाम व वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ.लक्ष्मणराव आसबे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

      यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धनंजय वैद्य,माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सागरबाबा,मिसळ,पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे,पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे,कार्याध्यक्ष जावेद मुलाणी,तालुका उपाध्यक्ष संदिप सुतार,जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी,तानाजी काळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, तालुका संघटक भिमराव आरडे,रामदास पवार,बाळासाहेब कवळे,सिने अभिनेता शिवकुमार गुणवरे,प्रविण नगरे,उदयसिंह जाधव,भिमसेन उबाळे,प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले,डाळज गावचे सरपंच विकास कुभांर,पळसदेव चे माजी सरपंच अनिल खोत,रमेश कुचेकर,उपसरपंच हनुमंत मेटे,तुकाराम जगताप, विठ्ठल काळे,रमेश कुचेकर,बालासो सवाने, युवराज कुंभार,दत्ता पवार,भरत भोसले,किशोर भोसले,सर्जेराव काळे,पोपट गावडे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव,दाजी देटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

            पुढे बोलताना डॉ.आसबे म्हणाले की,दान देण्याची किंमया मनुष्याच्या अंगी असावी लागते,दान दिल्याने व समाज उपयोगी काम केल्याने,आपल्या हातून केलेले काम सत्कर्मी लागत असते.संचारबंदी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तब्बल 13 हजार कुटुंबांना आधार देण्याची,भूमिका चोख पणे अन्नधान्य पुरवत बजावली आहे.याच बरोबरीने बावीस गावातील प्रत्येक कुटुंबा समोर फळझाड लागवड केल्याने या पत्रकार संघाने समाजहित जोपासले आहे.त्यामुळे जनता कायम पाठिशी राहिल अशीही माहिती डॉ.आसबे यांनी दिली.

           सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.डाळज गावचे सरपंच विकास कुंभार,पळसदेव चे माजी सरपंच अनिल खोत,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी उपस्थितीनां मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पवार यांनी केले तर प्रस्ताविक पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले.व आभार सागर शिंदे यांनी मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News