मंडळी लग्नाला चाललाय सावधान फक्त 50 लोकांनाच परवानगी,पालन न केल्यास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार होणार कारवाई -- पोलीस निरीक्षक नारायण पवार


मंडळी लग्नाला चाललाय सावधान फक्त  50 लोकांनाच परवानगी,पालन न केल्यास पोलीस अधीक्षक  अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार होणार कारवाई -- पोलीस निरीक्षक नारायण पवार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 पाहुणे मंडळी लग्नाला चाललाय तर सावधान,आता नवरा नवरीला सावधान म्हणायची वेळ संपली आता पाहुणे मंडळी,मित्र मंडळी,नातेवाईक यांनाच सावधान म्हणण्याची वेळ आली आहे, आता लग्नाला फक्त 50 लोकांनाच परवानगी आहे,पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात  कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत, पाहुणे मंडळी लग्नाला जाताय तर सावधान  ग्रामीण भागात तुळशी विवाह नंतर लग्न सोहळे सुरू होतात,त्याठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळेपोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी लग्न समारंभात 50 लोकांनाच परवानगी दिली जावी असे आदेश पुणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन ला दिले आहेत, त्यानुसार दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आदेशाचे पालन करीत दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांना याद्वारे कळविले आहे, आता लग्न समारंभ सुरू होत आहेत आणि कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे त्या पार्श्वभूमीवर लग्न व इतर समारंभात फक्त 50 लोकांनाच परवानगी देण्यात आल्याचे सांगितले आहे, सर्व मंगलकार्यालय व्यवस्थापणास ज्या घरातील लग्न कार्य आहे त्यांच्या घरातील पाहुणे मित्र मंडळ यांच्या  50 लोकांची यादी त्यांच्याकडे घ्यायची आहे,त्यानुसार नियमांचे पालन करायचे आहे, सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम आयोजित करण्यात यावा,सॅनिटाईझर चा वापर करणे,मास्क वापरणे या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे तसे न झाल्यास मंगलकार्यालय आणि आयोजकावर प्रभावी कारवाई केली जाणार आहे,बेकायदा जमाव करू नये, कायद्यांचे उल्लंघन करू नये अन्यथा आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News