क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्य तिथी निमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव साजरा


क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्य तिथी निमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव साजरा

समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्याचे कार्य खर्या अर्थानी महात्मा फुले व सावित्री फुले यांनीचं केले :- संजय देशमुख

शिरूर । प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

        क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढून महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे प्रतिपादन नगरसेवक संजय देशमुख यांनी केले.

       क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती व महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शिरूर येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी नगरसेवक देशमुख अभिवादन करताना बोलत होते.

     तसेच अभिवादन कार्यक्रमासाठी ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती व महात्मा फुले समता परिषदेच्या राजेंद्र खेतमाळीस,ज्ञानेश्वर कोल्हे, रामभाऊ होले,आनंद भुजबळ,रमेश रासकर,दिपक ननवरे,किरण खराडे ,गोरख शिंदे यांसह समितीच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले.

              याप्रसंगी शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक शिवसेनेचे जिल्हा संघटक  संजय देशमुख,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पोपटराव शेलार,भाजप कोषाध्यक्ष जयसिंग पाचर्णे,प्रा.मगर सर,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी कर्डीले,मुस्लीम जमातीचे अध्यक्ष  इकबालभाई सौदागर,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष शरद कालेवार,राष्ट्रवादीचे दिनकर पाडळे यांसह मान्यवर उपस्थित होते. 

   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News