खंडाळा परिसरात प्रथमच कुचेकर गायकवाड यांचा सत्यशोधक विवाह सम्पन्न


खंडाळा परिसरात प्रथमच कुचेकर गायकवाड यांचा सत्यशोधक विवाह सम्पन्न

पिंपरे बु.-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे ह.भ.प.गोरख कुचेकर महाराज यांची सत्यशोधिका ज्ञानेश्वरी उर्फ प्राजक्ता कुचेकर आणि सत्यशोधक सौरभ अशोक गायकवाड यांचा  कुचेकर यांचे मुळ रहाते घरी दारासमोर पिंपरे बु.खंडाळा परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह सोहळा  पार पडला.

 सुगंधी फुलाच्या पायघड्यावरून चालत येत हातात वधु वर यांनी भारतीय संविधान धरून आगमन केले त्यावेळी विवाह मंडपात महापुरुषांचे नावाचा आणि संविधानाचा जयघोष करण्यात आला.

यावेळी विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी कालच  संविधान दिन भारतभर साजरा झालेचे सांगून, स्त्री पुरुष समानता,मानवंताधर्म तसेच सर्वाना समान न्याय भूमिकेतून गरीब,श्रीमंत व भिकारी असलेतरी मतदान एकदाच करण्याचा हक्क समान देऊन जगात एक आदर्श 395 कलमांची राज्यघटना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब यांनी देऊन आपल्या भारतीयांनवर मोठे उपकार केलेत.या कोव्हिडं 19 मध्ये या संविधानाचे महत्व सर्वांनी जाणले आहे.तसेच आजचा हा   सत्यशोधक विवाह संस्थेचे वतीने 21 वा सम्पन्न होत असताना, दि.7 डिसेंबर 2020 रोजी संस्थेच्या वतीने 22 वा सत्यशोधक विवाह तेलंगाणा राज्यातील पहिला होणार असल्याचे सांगितले .

यावेळी या भागातील आमदार मदन आबा पाटील बाहेर गावी असल्याने येऊ शकले नाही पण त्यांनी आवर्जून त्यांचे बंधू मिलिंददादा पाटील यांना प्रतिनिधी म्हणून  पाठविले त्यांचे हस्ते वधु वर यांना सत्यशोधक विवाहाचे प्रमाणपत्र आणि थोरसमाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा भेट दिली .यावेळी सरपंच विनायक बिचुकले,उमेश जाधव,युवा नेते तुषार वाघ,माळी महासंघ महाराष्ट्राचे संघटक रोहित टिळेकर ,ग्रा.प.सदश्य विकास कुचेकर उपस्थित होते.

तसेच महात्मा फुले यांच्या 130 व्या स्मृतिदिना निमित्त वधु वर यांचे  हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले 130 ग्रंथ मान्यवर आणि मुली महिलांना  भेट देण्यात आले. सुरवातीला ज्ञानेश्वरी आणि सौरभ यांचे हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार   अर्पण करून पृथ्वी ची पूजा करून पर्यावरण समतोल साठी  झाडे जगविली पाहिजे म्हणून एका आंब्याचे झाड देखील विवाहप्रित्यर्थ कुंडी मध्ये लावून त्याला दोघांनी पाणी घालून पूजन केले. 

यावेळी महात्मा फुले यांचे वेशभूषेत रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाहाची माहिती देऊन सर्वांनाकडून सत्याचा अखंड गाऊन घेतला तर हनुमंत टिळेकर यांनी भारतीय उद्देशिका वाचन केले आणि राष्ट्रीय ओबीसी म्महासंघाचे विश्वस्त प्रा.सुदाम धाडगे यांनी  टिळेकर,ढोक यांचे समवेत महात्मा फुले यांची मंगळाष्टक म्हणून सोहळ्यास रंगत आणली.

याप्रसंगी अक्षता रुपी तांदूळाची नासाडी होते म्हणून अधिकचे तांदूळ असे 15 दिवस पुरेल इतके अभिनव मतिमंद मुलांची शाळा ,पलूस, सांगली प्रतिनिधी सुभद्रा गाडवे विशेष शिक्षिका आणि कै. सुशिलाबाई  घोडावत निवासी अंधशाळा, मिरज प्रतिनिधी श्रीमती रेखा गायकवाड, काळजी वाहक शिक्षिका यांचे कडे रोख रक्कम आणि त्यांना व ज्ञानेश्वरी चा योग्य प्रकारे सांभाळ माता म्हणून केला त्या श्रीमती सुरेखा धोत्रे यांना येवला पैठणी साडी देऊन योग्य सन्मान केला.

सत्यशोधक विवाहास संमती दिले बद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे दोन्ही आई वडील तसेच कोव्हिडं काळात आरोग्यसेविका म्हणून महत्व पूर्ण काम सुहासिनी कुचेकर यांनी  केले त्यांचा देखील सन्मान पत्र देऊन सन्मानित केले.

विवाह मंडपात महापुरुषांचे मोठे होल्डिंग व त्याचे विचाराचे बॅनर्स , निसर्ग,पर्यावरण,मुलगी वाचवा,जल वाचवा  संदेश बॅनर्स आणि रुखवतात महापुरुषांचे 100 चे वर ग्रंथ याने लक्ष वेधून  घेतले.हा आदर्श सत्यशोधक विवाह म्हणून सर्वत्र कुटूंबाचे  कौतूक होत होते तर अनेक पालकांनी व मुलामुलींनी  सत्यशोधक विवाह हीच प्रथा योग्य असून आम्ही यापुढे असेच विवाह करू असे मते मांडली. 

हा विवाह यशस्वी होणे कामी  सत्यशोधक चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते ऐ. डी. पाटील यांनी मोलाची मदत केली.आभार मुकुंद कुचेकर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News