महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन


महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

शिक्षणाची मशाल पेटवून महात्मा फुलेंनी सर्व समाजाला प्रकाशमान केले -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अजय दिघे, महादेव कराळे, माजी नगरसेवक विष्णू म्हस्के, ओबीसी सेलचे अमित खामकर, युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, उपाध्यक्षा सुजाता दिवटे, वकिल सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाने, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, मारुती पवार, जालिंदर बोरुडे, निलेश इंगळे, नितीन डागवाले, बन्सी खेतमाळीस, गणेश बोरुडे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, रुढी, पंरपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करुन दिली. शिक्षणाची मशाल पेटवून सर्व समाजाला प्रकाशमान केले. आज विविध क्षेत्रात महिला कर्तृत्व गाजवित असून याचे श्रेय महात्मा फुलेंना जाते. त्यांनी आपले आयुष्य दीन, दलित व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांचे विचार आज समाजाला दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा. माणिक विधाते यांनी शिक्षणावर ठरावीक लोकांची मक्तेदारी त्यांनी मोडित काढून, महिलांसह सर्वांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करुन दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला खर्‍या अर्थाने सुरुवात महात्मा फुले यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर त्यांनी केला असल्याचे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News