शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या तातडीने सोडवा!! आमदार आशुतोष काळेंच्या महापारेषण,महावितरणला सूचना


शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या तातडीने सोडवा!!  आमदार आशुतोष काळेंच्या महापारेषण,महावितरणला सूचना

नागरिकांना व शेतकऱ्यांना येत असलेल्या विजेच्या समस्या सोडविण्याबाबत महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

               कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या महावितरण, महापारेषण बाबत अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणी येत असून या  अडचणी तातडीने सोडवा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महापारेषण,महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

       मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेवून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.मतदार संघातील अनेक गावातील २५ के.व्ही. क्षमतेचे रोहित्र चोरीला गेलेले असून त्याठिकाणी आजपर्यंत नवीन रोहीत्र बसविले नाही त्याठिकाणी तातडीने रोहित्र बसवा. मतदार संघात बरेच रोहित्र हे नादुरुस्त आहेत ते सर्व रोहित्र तातडीने दुरुस्त करा. कोपरगांव शहर व ग्रामीण भागातील लोंबलेल्या वीजवाहिन्या व वाकलेले पोल तातडीने दुरुस्त करा. आदिवासी वाडी योजने अंतर्गत मतदार संघातील दिले जाणारे प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करावा. विधानसभा तारांकीत प्रश्न क्रमांक - १७७७० नुसार येवला व कोळपेवाडी फिडरवरील लोड कमी करण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांचा आराखडा तातडीने सादर करा. तसेच विधानसभा तारांकीत प्रश्न क्रमांक - १७७७५ नुसार ब्राम्हणगांव व धामोरी उच्चदाब वितरण प्रणाली एच.व्ही.डी.एस. योजने अंतर्गत नवीन ३३ के.व्ही. उपकेंद्र मंजुरी करिता प्रस्ताव तातडीने सादर करा. कोकमठाण, संवत्सर, कान्हेगांव, वारी येथील वीज पुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने होण्यासाठी नवीन बे ची उभारणी करण्यात आलेली आहे. परंतु त्याची जोडणी अद्याप झालेली नसून ती जोडणी लवकरात लवकर करून शेतकरी व नागरिकांचे समाधान करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

           या बैठकीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,अधीक्षक अभियंता संतोष सांगळे,कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, सहाय्यक अभियंता यशवंत देशमुख,सहा.कार्यकारी अभियंता मुळे,उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा,सहा. कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, उपकार्यकारी अभियंता डी.डी.पाटील,सहाकार्यकारी अभियंता डी.डी.राठोड आदि उपस्थित होते.जाहिरात
Search
विडिओ
Recent News