दौंडमध्ये उत्साहात ७१ वा संविधान गौरव दिन साजरा


दौंडमध्ये उत्साहात ७१ वा संविधान गौरव दिन साजरा

सुरेश बागल  दौंड प्रतिनिधी:

दौंडमध्ये उत्साहात ७१ वा संविधान गौरव दिन साजरा संसद रत्न खासदार माननीय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान स्तंभाची समिती व नगरपरिषद दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तालुका तथा  शहरामध्ये चित्ररथ द्वारे, भित्तीपत्रके, हस्तपत्रके द्वारे संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य संविधानातील आदर्श तत्वे संपूर्ण तालुक्यामध्ये दि. २४ व २५ या दिवशी घराघरात ,गावागावात ,संविधानाचे विचार पोहोचवण्याचे काम समितीने केले.त्याचा सांगता समारंभ दि. २६ नोव्हेंबर२०२० रोजी सायंकाळी ६:००वा. राष्ट्रसंत गाडगे महाराज चौक येथे माजी आमदार तथा पी. डी.सी.सी. बँक पुणे अध्यक्ष आदरणीय श्री रमेश आप्पा थोरात यांच्या शुभ हस्ते दौंड तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते,धर्मगुरू, विशेष व्यक्ती यांना भारतीय संविधानाच्या प्रति देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात माननीय श्री रमेश आप्पा थोरात यांनी समितीने हा जो उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने  संविधानाचे महान कार्य गावागावात, घराघरात पोचवण्याचे काम श्री दिपक भाऊ सोनवणे यांनी केल्यामुळे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.तसेच भविष्यात कसलीही अडचण आल्यास आम्ही त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी  दर्शवली या कार्यक्रमासाठी  विशेष उपस्थिती  व सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका अध्यक्ष श्री आप्पासाहेब पवार,  पुणे जिल्हा  परिषद सदस्य  वीरधवल जगदाळे पाटील, पुणे जिल्हा गटनेते श्री बादशहा भाई शेख, अध्यक्ष  राष्ट्रवादी  सामाजिक न्याय विभाग  जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र भैय्या बडेकर, दौंड उपनगराध्यक्ष श्री वशिम भाई शेख,पुणे जिल्हा  अल्पसंख्यांक अध्यक्ष श्री  सोहेल भैया खान,  पुणे समाज कल्याण सभापती सौ सारिका ताई पानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष (महिला) वैशालीताई नागवडे, पुणे जिल्हा युवती (महिला) अध्यक्षा पूजा बुट्टे पाटील, दौंड शहराध्यक्ष  श्री गुरु मुख  नारंग, नगरसेविका  प्रणोती चलवादी,  माजी नगरसेवक  श्री उत्तम सोनवणे,  श्री नितीन डाळिंबे, श्री नरेश डाळिंबे,  श्री आबासाहेब वाघमारे,  श्री विकास कदम,हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन श्री दिपक भाऊ सोनवणे यांनी केले  होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सोमनाथ कांबळे, श्री निलेश लोंढे, श्री प्रकाश जाधव,श्री जयदीप बनकर,, श्री मिलिंद सोनवणे, श्री प्रकाश शिंदे श्री अशोक कांबळे श्री कैलास कांबळे श्री बापूराव लोंढे जाकीर भाई शेख ,श्री सागर सोनवणे, श्री मेहराज  शेख व सर्व सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News