नगर शहरातील आरोपीला अहमदनगर पोलिसांनी केले एका वर्षाकरीता स्थानबध्द


नगर शहरातील आरोपीला अहमदनगर पोलिसांनी केले एका वर्षाकरीता स्थानबध्द

अहमदनगर –(प्रतिनिधी संजय सावंत) जिल्हादंडाधिकारी राजेंद्र भोसले आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणाऱ्या विरुध्द एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे दिलेल्या संकेतानूसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु तस्कर व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१ चे कायद्या अंतर्गत एका कुख्यात गुन्हेगारला १ वर्षाकरीता स्थानबध्द (अटक) करण्यात आले आहे.


  


मिळालेली माहिती नुसार पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वाळू तस्कर, तसेच धोकादायक व्यक्ती अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेले होते. त्या अनुषंगाने धोकादायक व्यक्ती इसम नामे बंटी उर्फ भावेश अशोक राऊत वय-२९ वर्षे, रा. लाटेगल्ली, माणिकचौक, ता.जि. अहमदनगर यांचे विरुध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कोतवाली पोलीस स्टेशन यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अंतीम निर्णय घेवून वर नमुद धोकादायक व्यक्ती यास २७ नोव्हेंबर २०२० रोजी पासुन एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत.त्यावरुन सदर स्थानबध्द इसम नामे बंटी उर्फ भावेश अशोक राऊत वय-२९ वर्षे, रा. लाटेगल्ली, माणिकचौक, ता.जि. अहमदनगर यांस मा. पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील साो, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली   सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर, यांच्या पथकांतील अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेवून २७ नोव्हेंबर २०२० रोजी पासून एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द (अटक) करण्यात आले आहे. स्थानबध्द करण्यात आलेला धोकादायक इसम नामे बंटी उर्फ भावेश अशोक राऊत वय-२९ वर्षे, रा. लाटेगल्ली,  माणिकचौक, ता.जि. अहमदनगर , याचे विरुध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.१) कोतवाली ३७२/२०१९ आर्म अॅक्ट ४/२५,

२) कोतवाली । १००२/२०१९ आर्म अॅक्ट ४/२५

३) तोफखाना ॥ ३०/२०१८ भादविक ५०० व पोलीस (अप्रितीची भावना चेतावणे) अधिनियम १९२२ चे कलम ३

४) तोफखाना ॥ ५८/२०१८ आर्म अॅक्ट ४/२५,

५) तोफखाना १०१/२०१८ भादविक ३०८,४२७,१४३, १४७१४८,१४९,महापोकाक ३७(१) (३)/१३५तोफखाना । १०२/२०१८भादविक ३५३,३०८,

६) तोफखाना । ३९५/२०१६ भादविक ३९५,३२४,५०६, २०१,आर्म अॅक्ट ३/२५. ४/२५

७) कोतवाली 1 ८०/२०१५ भादविक ३५३,१४३,१४७, १४९, ३३६, ३३७, ३३२,४२७ सह क्रि.लॉ.अमेंटमेंट क.३,७ महापोकाक ३७(१)(३/१३५

८) तोफखाना । ३८८/२०१५ भादविक ३२७,३२३,५०४,५०६,३४

९) कोतवाली ४७७१/२०२० भा.द.वि.क, ३९५

यामुळे या आरोपी विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशनला धारदार शस्त्र जवळ बाळगणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे व जिवीतास धोका होईल असे कृत्य करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करुन गैरकायदयाची मंडळी जमवुन दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, शस्त्रासह दरोडा टाकणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, आपखुशीने दुखापत करुन वस्तुची विल्हेवाट लावणे, बदनामी करणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर स्थानबध्द इसमाविरुध्द प्रस्ताव सादर करुन स्थानबध्द इसमाला स्थानबध्द करणे करीता  पोलीस अधिक्षक मनोज पाटील  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री. सौरभकुमार अग्रवाल सो, श्री संदिप मिटके सो, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, श्री विशाल ढुमे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अनिल कटके, तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री प्रविण लोखंडे, कोतवाली पो स्टे, पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगावकर, कोतवाली पो स्टे, सपोनि श्री शिशीरकुमार देशमुख, पोसई श्री गणेश इंगळे, पोसई मधूकर शिंदे, पोहेकॉ/ संदिप घोडके, पोहेकॉ/ भाऊसाहेब कुरुंद, पोना/ शंकर चौधरी, पोना/ रवि सोनटक्के, पोना/ दिपक शिंदे, पोकॉ/ योगेश सातपुते, कमलेश पाथरुट, सागर ससाणे, रोहित येमुल, जालींदर माने, किरण जाधव, स्थागुशा व कोतवाली पोस्टे चे पोहेका/ कैलास सोणार, पोका/ मुकुंद दुधाळ,तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अक्षय फलके, यांनी सदरच्या कारवाईमध्ये मदत केलेली आहे. आगामी काळात वाळू तस्कर, धोकादायक इसम, हातभट्टी दारु माफीया व अवैध धंदे, झोपडपट्टी दादा यांचे विरुध्द एम.पी.डी.ए.कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News