पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले तालुक्यातील पोलिस पाटलांना विविध विषयावर मार्गदर्शन !!


पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले तालुक्यातील पोलिस पाटलांना विविध विषयावर मार्गदर्शन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव . आज शक्रवार दि २७ नोहेंबर रोजी  कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेल पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब यांचा  कोपरगाव तालुक्यातील पोलिस पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला 

यावेळी तालुक्यातील गावांची माहिती व गावात नव्याने उपस्थितीत होणारे गुन्हे तसेच तालूक्यातील गावांमधील चोरी, रस्ता लुट ,गाडी चोर,साधी चोरी, दरोडा यात कार्यान्वित असणाऱ्या चोरट्यांच्या संबंधीची माहिती तसेच ग्रामीण भागात सुरू असलेलेअवैधं धंदे याबाबतची माहीती जाधव साहेबांनी पोलीस पाटलांकडुन यावेळी घेतली.

 ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग थांबवण्या करीता शासकिय नियमांचे पालन होण्याकरीता काय उपाययोजना करावयाची या बद्दल जाधव साहेबांनी उपस्थित पोलिस पाटलांना मार्गदर्शन केले  तसेच गावातील लहान सहान वादांवर प्रकर्षाने बारीक लक्ष ठेवण्याच्या सुचना पोलिस पाटलांना दिल्या.

 या वेळी खिल्लारी,देवेन माळवदे, बाबा गायकवाड,पंडित पवार, सौ.कांचन राऊत व टुपकेताई आदी पोलिस पाटील उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News