ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण !! - प्रशांत शिंदे


ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण !! - प्रशांत शिंदे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी समाज संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचवण्यासह ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केली.

 ओबीसीच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन शिस्तबद्ध पद्धतीने कोपरगाव तहसिलदार योगेश चंद्रे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

 यांप्रसंगी प्रशांत शिंदे बोलतांना म्हणाले की,अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्य व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा व ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे मराठा समाजाचा समावेश ओबीसींमधे झाल्यास ५२% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना अवघ्या १७% जागा दिल्या गेल्या आहेत आणि त्यातल्या १२% जागाच भरल्या आहेत अशा अवस्थेत  मराठा समाजाला घेतल्यास त्यांनाही काही मिळणार नाही व ओबीसींचेही नुकसान होणार असल्याचे शेवटी शिंदे म्हणाले.

   तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनप्रसंगी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड,महिला जिल्हाध्यक्ष हर्षदा बोरावके, ग्लोबल ट्रस्टचे प्रदेशध्यक्ष अशोक लकारे,समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस मनिष जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य डाॕ. मनोज भुजबळ, माजी नगरसेवक दिनार कुदळे,समता परिषदेचे शहरध्यक्ष विशाल राऊत, महात्मा फुले मंडळाचे उपध्यक्ष रविंद्र चौधरी,किरण सुर्यवंशी,अरुण शिरसाठ, दत्ताञय दुशिंग, गोरख पंडोरे,  विनायक गायकवाड, संतोष वढणे,संतोष जाधव, योगेश बागुल,सुभाष कोळपकर, किरण थोरात,किरण बिडवे, आदि ओबीसी समाज उपस्थितीत होते. 26 नोव्हेंबर रोजी मुंबई वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत शहीद पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चा विसर्जित करण्यात आला .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News