आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची निकालाची परंपरा कायम


आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची निकालाची परंपरा कायम

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण आबासाहेब काकडे बी.एड्. द्वितीय वर्षाचा विद्यापीठ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये महाविद्यालयाचा निकाल ९२.५ टक्के लागला आहे. यामध्ये  ताके महेश वसंतराव याने प्रथम, भाकरे हर्षल राजेंद्र याने द्वितीय तर बोरूडे अरविंद भाऊसाहेब याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन. उदमल्ले, महाविद्यालयाचे समन्वयक शिवाजीराव लांडे व आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे व जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा.लक्ष्मणराव बिटाळ यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या शैक्षणिक वर्षात o (ओ) ग्रेडमध्ये एकूण दहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News