कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SRP ग्रुप मधील प्रसिद्ध बोऱ्हाळे म्हसोबाची यात्रा रद्द,भाविकांनी सहकार्य करावे --समादेशक श्रीकांत पाठक


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SRP ग्रुप मधील प्रसिद्ध बोऱ्हाळे म्हसोबाची यात्रा रद्द,भाविकांनी सहकार्य करावे --समादेशक श्रीकांत पाठक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:- दौंड शहरालगत दौंड कुरकुंभ रोडवर (SRP) राज्य राखीव बलाचे 5 आणि 7 असे  दोन ग्रुप आहेत,याठिकाणी खूप पुरातन काळापासून बोऱ्हाळे म्हसोबा देवस्थान आहे,दोन्ही गटातील कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक याठिकाणी दर्शनाला येत असतात ,येथील यात्रा उत्सव खूप मोठा भरतो,गोपाळवाडी गावातील मानकरी येथे देवाचा छबिना भरवतात,पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवाची कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंगळवार दिनांक 1/12/20 रोजी होणार यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचे गट 5 चे समादेशक तानाजी चिखले आणि गट 7 चे समादेशक श्रीकांत पाठक यांनी सांगितले आहे, कोरोना पुन्हा सुरू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, या यात्रेत भाविक,छोटे मोठे दुकानदार,विक्रेते,पाळणे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि गर्दीमुळे हा संसर्ग जास्त फैलावतो,कोणीही मंदिर परिसरात येऊ नये,नारळ हार फुले अशा कोणत्याही वस्तू घेऊन येऊ नये, यावर्षी घरीच राहून देवाची आराधना करावी यासाठी सर्व भाविकांनी या वर्षी सहकार्य करण्याचे आवाहन समादेशक तानाजी चिखले आणि श्रीकांत पाठक यांनी नाथांच्या भाविक भक्तांना केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News