8 डिसेंबर 2020 रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत


8 डिसेंबर 2020 रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत

प्रतिनिधी-भालचंद्र महाडिक बारामती

बारामती, दि. 27 :-  मा. जिल्हाधिकारी , पुणे यांचेकडील पत्रानुसार सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. यानुसार दिनांक 8 डिसेंबर 2020 ही तारीख सरपंच आरक्षण सोडतीसाठी निश्चित करण्यात आली आहे.या आरक्षण सोडतीचे वेळी काढलेले आरक्षण हे सन 2020 - 25 या मुदतीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी लागू राहणार आहे.

            बारामती तालुक्यासाठीची आरक्षण सोडत दिनांक  8 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह , बारामती येथे तहसिलदार बारामती यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे , आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News