गोविंदबन कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन,पर्यटकांचा ओघ सुरू


गोविंदबन कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन,पर्यटकांचा ओघ सुरू

 श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे):गोविंदबन कृषी पर्यटन केंद्राचे कोरेगाव    येथे आज डॉ. सोनवणे, संचालक, मॅक्स केअर हॉस्पिटल यांच्या शुभहस्ते उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला . शहरी भागातील पर्यटका करिता हे पर्यटन केंद्र आकर्षणाचा केन्द्रबिन्दु ठरत आहे. हुरडा पार्टी केन्द्र  म्हणून दोन वर्षापुर्वी उदयास आलेले हे केन्द्र आज ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले असून, आता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडे अधिकृत रित्या नोन्दणी झालेले  श्रीगोंदा तालुक्यातील प्रथमच आणि एकमेव ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र आहे

  गुलाबी थंडी मधील निसर्ग रम्य वातावरण, गरमा गरम हुरडा, शेंगदाणा चटणी, तिळ चटणी  याच्या जोडीलाच  वैविध्य पुर्ण गावरान बाज असणारे चुलीवरील खाद्यपदार्थ, ऊसाचा ताजा रस, बैलगाडी व घोडागाडी मधुन सफर,लहान मुलांना खेळण्यासाठी भोवरा,विट्टीदान्डी, गोट्या,लगोर बरोबर विविध खेळणी, क्रिकेट, वॉलीबॉल या खेळाची मैदाने  , विविध भाजीपाला व फळ पिकांचे प्लॉट ,तसेच सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या कडधान्य,डाळी,चटण्या ,भाजीपाला-फळे यांचे शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवरील थेट विक्री केन्द्र आणि या जोडीला या केंद्राचे चालक श्री. बाळासाहेब मोहारे, श्री.दादासाहेब  साबळे व त्यांच्या कुटुंबियाचे आदरातिथ्य हे या ठिकाणचे विशेष. शहरातील गोगाटं  दररोजची धकाधक याना कंटाळलेल्या शहरी नागरिकांना हे ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे. आज डॉ.सतिश सोनवणे, डॉ. शारदा महान्डुळे,डॉ.प्रशातं महान्डुळे,

डॉ सौ.नयना भापकर ,डॉ.संतोष भापकर आणि  श्री.पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी व श्री. ज्ञानेश्वर सातपुते, मंडळ कृषी अधिकारी, सहकारी सोसायटी संघटनाचे जिल्हाध्यक्ष श्री. निलेश पवार,पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री.सुहास इगंवले हे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. 

 शहरी कोलाहलातुण वेळ काढत, कोरेगाव येथील निसर्ग रम्य वातावरणात ग्रामीण कृषी संस्कृतीची ओळख करून देणार्या या केन्द्रास आवर्जून भेट द्यावी", डॉ.सतीष सोनवणे, संचालक, मॅक्स केअर हॉस्पिटल, अहमदनगर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News