बोरिभडक चंदनवाडी येथील हॉटेलवर पोलीसांचा छापा,44970 रुपयांचा दारू साठा जप्त,दोघांवर गुन्हा दाखल,एक अटक


बोरिभडक चंदनवाडी येथील हॉटेलवर पोलीसांचा छापा,44970 रुपयांचा दारू साठा जप्त,दोघांवर गुन्हा दाखल,एक अटक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : - दौंड तालुक्यातील बोरिभडक चंदनवाडी  येथील जय तुळजाभवानी हॉटेल आणि श्रावण लॉज याठिकाणी छापा टाकून दारू साठा जप्त केला असून पो ना  कमलेश होले यांच्या फिर्यादीवरून  यवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे,दिपक वाईकर,पो ना सुभाष डोईफोडे,कमलेश होले यांच्या पथकाने आज दौंड तालुक्यातील बोरिभडक चंदनवाडी येथील जय तुळजाभवानी हॉटेल व श्रावण लॉज वर छापा टाकला असता त्याठिकाणी 44970 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा सापडला असून 1) सौदागर भिमराव फुगे वय 42 2) सूर्यकांत रघुनाथ चौरे दोघे ही राहणार बोरिभडक चंदनवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे  यांच्यावर पो ना कमलेश होले यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण अटक अटक करण्यात आला आहे.पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News