जोशीवाडी येथील पुलाचा धोकादायक कठडा दुरुस्त करावा :- अप्पासाहेब ढवळे ...सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष


जोशीवाडी येथील पुलाचा धोकादायक  कठडा दुरुस्त करावा :- अप्पासाहेब ढवळे ...सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरुर । प्रतिनिधी शिरुर शहरात जोशीवाडी या उपनगरातील संगमेश्वर रेसीडन्सी ( डेरेमामा कॉम्प्लॅक्स ) समोरील नाल्यावरील कठडा तुटल्याने अनेक अपघात  होत असुन भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अपुर्ण कामे त्वरीत जलद गतीने पुर्ण करावी अन्यथा  माहिती सेवा समित्त्या वतीने तीव्र आदोलन करण्यात येईल असा इशारा माहीती सेवा समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब ढवळे यांनी दिला.

शिरुर शहरात जोशीवाडी या उपनगरातील संगमेश्वर रेसीडन्सी ( डेरेमामा कॉम्प्लॅक्स ) समोरील नाल्यावरील कठडा तुटल्याने या ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत तसेच याबाबत संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्याकडे केली असता असमाधानकारक उतरे मिळाल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांचेकडे तक्रार केली असता त्यानुसार शाखा अभियंता गवळी यांनी सदर ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली व काही दिवसांनी या कठड्याच्या कामाला सुरुवात देखील केली पण झालेले काम हे निकृष्ठ दर्जाचे असल्याने तो अरुंद पुलावरील कठडा पुन्हा काही दिवसातच तुटल्याने व सदर तुटलेल्या कठड्याच्या कडेला पुलालगत बाभळीचे काटेरी झुडुप वाढल्याने शालेय विद्यार्थी सायकलरुन प्रवास करत असताना व मोटार सायकल स्वारांना तर चारचाकी वाहन चालकांना अरुंद रस्ता व तुटलेल्या कठड्यामुळे नकळतपणे या ठिकाणी होणाऱ्या अपघातास सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा असुन सार्वजनिक बांधकाम विभाग हा जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष करीत असुन या सा.बां विभागाच्या कामाविषयी नागरिकांकडून नाराजी आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्यांनी लक्ष घालून पुलाच्या तुटलेल्या कठड्याची दुरुस्ती केली नाहीतर होणाऱ्या पुढील परिणामास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकल्प पुणे राहिल अशी प्रखर प्रतिक्रिया अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे शिरुर शहर अध्यक्ष अप्पासाहेब ढवळे यांनी  व्यक्त केली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News