संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव शहरातील नामांकीत श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत आज २६नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संविधान दिन उत्साहाने संपन्न झाला.
या प्रसंगी भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर सर यांचे हस्ते करण्यात आले.
विदयालयाचे जेष्ठ शिक्षक रवि पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन एस.डी.गोरे ई.एल जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी विदयालयाचे जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी.यांनी संविधान हा भारतीय सार्वभौम तत्वाचा मुळ पाया आहे व त्यामुळे प्रत्येक नागरीकांना हक्क व कर्तव्याची जाणीव झाली असे संविधानाबाबतचे आपले विचार व्यक्त केले.यावेळी संविधान दिना निमित्तानं त्याचे वाचन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी सर्वांना राष्ट्रीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला गायकवाड आर.बी,तुपसैंदर,डी.व्ही,लकारे, आर.आर,कुळधरण,सौ. बी.बी.पुरी,एस.व्ही,बोरावके आर.आर,आदि शिक्षक सोशल डिस्टिगशन पाळुन उपस्थित होते.