जेऊर कुंभारी येथे संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !!


जेऊर कुंभारी येथे संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी संजयनगर येथे संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्चा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित उपासक यांनी सामुदायिक त्रिषरण व पंचशील घेऊन महामानवाला अभिवादन केले. या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक चे सामूहिक वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक राव गायकवाड व भास्कर राव वकोडे यांनी उपस्थितांना भारतीय संविधान व त्याप्रती नागरिकांचे अधिकार तसेच कर्तव्य व जबाबदारी यासंदर्भात मार्गदर्शन केले.शेवटी दिपकराव गायकवाड यांच्या हस्ते उपस्थितांना त्रिषरण,पंचशील व बुद्ध वंदना पुस्तिकेचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष तथा आर पी आय चे प्रदेश सचिव दीपक राव गायकवाड,स्मारक समिती उपाध्यक्ष बाबुराव काकडे,सनदी लेखा परीक्षक भास्कर वाकोडे,ग्रामपंचायत सदस्य नाना मोहिते,नवनाथ गायकवाड, संजय भालेराव,बाळासाहेब पगारे, किसन गायकवाड,निवृत्ती साळवे,चांगदेव गायकवाड, कुंदन पठारे,कोंडीबा काकडे, सोपान चव्हाण,मार्तंड बाबा जाधव,गवई, संजय आव्हाड, भीमा साळवे, प्रदिप गायकवाड, सुमित पगारे, तुषार गायकवाड, अमोल काकडे, सौरव गायकवाड,पप्पू गायकवाड,भारत गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News