कुंभारी येथील बसथांबा परीसरात ग्रामस्थांची स्वच्छतागृहाची मागणी !!


कुंभारी येथील बसथांबा परीसरात ग्रामस्थांची स्वच्छतागृहाची मागणी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी  

 मौजे कुंभारी येथील कोपरगाव कोळपेवाडी मुख्य रस्त्यावरील बसथांबा परीसरात ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने विकास खळे यांनी सरपंच तसेच ग्रामसेवक यांना दिले आहे.

कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्यावरील कुंभारी गाव हे माध्यमिक शाळा,पतसंस्था, शासनमान्य आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र,ए.टी एम.मशिन या सर्व सोयीसुविधा मुळे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण बनले आहे.या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशील धारणगाव,माहेगाव( देशमुख ) हिंगणी.यांच्यासह तालुक्यातुन येणाऱ्या नागरीकांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.यामध्ये महिलांचाही समावेश आहे.अशा वेळी या ठिकाणी स्वच्छतागृहाची कुठलीही सोय नसल्याने नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागतो याचा त्रास विशेषता महीलावर्गालाच जास्त होतो तसेच या भागात व्यावसायिकांची दुकाने असुन गावातुन बाहेरगावी जाणाऱ्यां प्रवाश्यांना येथेच बस तसेच इतर वाहनांच्या प्रतिक्षेत थांबावे लागते अशावेळी स्वछतागृहाची सोय नसल्याने वेळेला तारांबळ उडते,तरी ग्रामपंचायतीने या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर स्वच्छतागृहाचे नियोजन करावे,अशी मागणी कुंभारी ग्रामस्थांचे वतीने करण्यात येत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News