बी. एस. एन. एल. मधील सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्वरित मिळावा:भारतीय दूरसंचार संघाची मागणी


बी. एस. एन. एल. मधील सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्वरित मिळावा:भारतीय दूरसंचार संघाची मागणी

कुरकुंभ:प्रतिनिधी

 बी .एस.एन् .एल्. मधील सर्व निवृत्त कर्मचारी शेवटच्या तिमाहीत जाहीर होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची वाट बघत होते. परंतु १९ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार केंद्र सरकारने आॕक्टोबर २०२० पासून महागाई भत्ता गोठवला आहे. हा अध्यादेश बी.एस.एन्.एल्.  आणि एम.टी.एन् .एल् . मधील निवृत्त कर्मचाऱ्यांना लागू करण्याची आवश्यकता नाही कारण हे कर्मचारी त्यांचे निवृत्ती वेतन सरकारी तिजोरीतून घेत आहेत . निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वाढीव महागाई भत्ता गरजेचा असतो. या आदेशामुळे सार्वजनिक उद्योगात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. या अन्याय्य आदेशाचा दूरसंचार खात्यातील BTEU(BSNL) आणि BDPS या भा.म.संघ प्रणीत संघटना निषेध करीत आहेत . संघटनेच्या आदेशानुसार दि. २४.११.२०२० रोजी या संघटनांच्या शिष्टमंडळाने कोरोनाचे सर्व नियम पाळून पुणे दूरसंचार कार्यालयात मा.प्रधान महाप्रबंधक श्री. संदीप सावरकर यांची भेट घेतली. श्री. हरि सोवनी  महामंत्री भारतीय दूरसंचार पेंन्शनर्स संघ यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने आपले निवेदन मा. प्रधान महाप्रबंधकांना दिले. या शिष्टमंडळात श्री. उदय गाडेकर, श्री. किरण राजहंस, श्री. जयवंत पुरंदरे, सौ.शोभा हर्डीकर, वंदना कामठे,  आदि पदाधिकार्यांचा समावेश होता. या विषयावर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बी एस एन एल मधील निवृत्त कर्मचारी रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल असा इशारा B D P S संलग्न भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी हरी सोवनी यांनी दिलेला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News