कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरवंडची यात्रा होणार साधेपणाने!


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरवंडची यात्रा होणार साधेपणाने!

वरवंड(प्रतिनिधी):-देशात असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजारामुळे;ग्रामिण भागातील कोरोनाच्या आजाराची भीती आजही कायम आहे.याच पार्श्वभूमीवर  संसर्गजन्य आजाराच्या संभाव्य वाढत्या; प्रसारामुळे या वर्षी  दिनांक २९ व ३० नोव्हेंबर रोजी; संपन्न होत असलेला"श्री गोपीनाथ महाराज यात्रा उत्सव"ग्रामस्थांनी साधेपणाने व गर्दी न करता आणि आरोग्य विषयक सर्व बाबींचे पालन करून साजरा करावा असं आवाहन सर्वाना करण्यात येत आहे.

याकाळात पै पाहुणे व मित्रमंडळी यांना यात्रेचं निमंत्रण देणं टाळावं, श्रींची पालखी, छबिना व लोटांगण सोहळा मर्यादित ग्रामस्थांच्या उपस्तीतीत साधेपणाने संपन्न होईल,मंदिरात दर्शन घेताना मास्क, सॅनिटायझर इ.चा वापर करून भाविकांनी दर्शन रांगेत सुरक्षित अंतर राखावे.तसेच या आजारात प्रामुख्याने लहान मुले व वयोवृद्धांनी दर्शनासाठी येऊ नये अशी विनंती आहे,या वर्षी पहाटे पासून होणारे भाविकांचे दंडवत होणार नाहीत. याचीही सर्वांनी नोंद घ्यावी.

  या वर्षी कोरोनामुळे मागील ९ महिन्यांपासून प्रत्येकजण अडचणीचा सामना करत आहेत.याची सर्वांनाच जाणीव आहे.या परस्थितीमुळे होतं असलेल्या गैरसोयीबद्दल यात्रा कमिटी वरवंड ग्रामपंचायत आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावं असे आवाहन पोलिस पाटील किशोर दिवेकर यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News