दौंड शहरात कोरोनाचा वाढता आलेख,आज पुन्हा 7 जण पॉझिटिव्ह,विना मास्क फिरणारांची संख्या वाढली,शासनाचे नियम धाब्यावर,


दौंड शहरात कोरोनाचा वाढता आलेख,आज पुन्हा 7 जण पॉझिटिव्ह,विना मास्क फिरणारांची संख्या वाढली,शासनाचे नियम धाब्यावर,

विठ्ठल होले  विशेष प्रतिनिधी: दौंड -शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, कोरोनाचा हा वाढता आलेख धोक्याची घंटा आहे,दौंड पोलिसांनी विना मास्क फिरणारावरील कारवाई शिथिल केल्यापासून शहरात  विना मास्क फिरणारांची संख्या वाढली आहे, शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरात गर्दी वाढत आहे,दिनांक 25/11/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 59 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले,पैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 52 व्यक्ती चे report negative आले आहेत,पॉझिटिव्ह  मध्ये महिला-- 2 व पुरूष - 5 आहेत,

प्रभाग -दौंड शहर=4,Srpf ---=3 या सर्व व्यक्ती 36 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News