संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
दि. डिसेंबर २o२० रोजी कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने विस्थापित टपरी धारकांच्या प्रश्नावर त्वरित तोडगा निघावा आणि खोका शॉप च्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला असुन या मागणीला कोपरगाव शहर शिवसेना, युवासेना ग्राहक, संरक्षण कक्ष, भा. वि. सेना या सर्व संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून तातडीने प्रशासनाने व कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे साहेब यांनी दखल घेऊन हा प्रश्नांच घोंगड भिजत न ठेवता ते निकाली काढावा यासाठी व्यापारी संघर्ष समितीच्या या उपोषणास कोपरगाव शहर शिवसेना, युवासेना, ग्राहक संरक्षण कक्ष,भा वि सेना यांनी जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जी सरोदे यांना देण्यात आले आहे .
या प्रसंगी मा.नगरअध्यक्ष संजयराव सातभाई मा.शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ,युवा सेना शहरप्रमुख नितीश बोरुडे,युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके,शिवसेना उपशहरप्रमुख बालाजी गोरडे, नाना जाधव वसीम भाई चोपदार,कक्ष शहरप्रमुख रवींद्र कथले ,आशिष निकुंभ,दीपक कराळे,अभि सूर्यवंशी आदी उपस्थित होते.