शेडगावात झालेल्या कामांची पंचायत समितीच्या चौकशी समिती मार्फत तपासणी


शेडगावात झालेल्या कामांची पंचायत समितीच्या चौकशी समिती मार्फत तपासणी

/श्रीगोंदा प्रतिनीधी अंकुश तुपे

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वामन भदे यांनी शेडगाव ग्रामपंचायतीने केलेली विकास कामे निकृष्ठ दर्जाचे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप केला होता या साठी गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी चार अधिकाऱ्यांची समिती केली होती. मात्र या चौकशी समिती मधील एकही अधिकारी चौकशीसाठी शेडगाव येथे हजर नव्हता फक्त गुणनियंत्रण विभागाचे शेळके व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी डी कांगुणे उपस्थित होते. यांनी यातील काही कामांची तपासणी केली असून या तपासणीचा अहवाल चुकीचा दिल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा भदे यांनी आज दिला आहे.

        तालुक्यातील शेडगाव ग्रामपंचायत ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या नेतृत्वाखाली होती व सरपंच पदी नाहाटा यांचे समर्थक विजय शेंडे हे सरपंच होते शेंडे यांच्या २०१४ ते २०२० या कालावधीमध्ये झालेल्या 32 कामाची चौकशीची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केली होती. त्यानुसार गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी या चौकशीसाठी चार सदस्यीय अधिकाऱ्यांची समिती नेमली होती मात्र प्रत्यक्षात आज दि. 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्या पैकी समिती मधील एकही अधिकारी उपस्थित नव्हते मात्र गुणनियंत्रक विभागाचे अधिकारी शेळके व शाखा अभियंता डी.डी कांगणे यांनी शेडगाव मधील 32 कामांपैकी काही कामांची पाहणी केली असून तो अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चौकशी समितीमध्ये नेमणूक केलेले अधिकारी उपस्थित न झाल्याने प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वामन भदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाले की आज पर्यंत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांच्या मार्फत दबावतंत्राचा वापर केला जात असल्याने अधिकारी व कर्मचारी चौकशीसाठी येत नाहीत असा आरोप करत आज ज्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आहे त्यानी जर या तपासणीचा अहवाल समाधान कारक न दिल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील भदे यांनी दिला आहे.

2014 ते 2020 या कालावधीमध्ये शेडगाव ग्रामपंचायत मार्फत सर्वाधिक निधी उपलब्ध करून त्याचा विकास कामांसाठी उपयोग केलेला आहे प्रत्येक काम हे दर्जेदार स्वरुपाचे झाले असून अंदाज पत्रक आपेक्षा ही जास्त जास्त काम ठेकेदारांकडून करून घेतलेले आहे या कामांमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही अथवा कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे झालेले नाही परंतु माझ्या वरती जो आरोप केला आहे तो निवडणूक जवळ आली असल्याने राजकीय हेतूने केला आहे. अशी प्रतिक्रिया सरपंच विजय शेंडे यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News