चांदेकसारे गाम्रथांनी समृद्धी महामार्ग चे काम बंद पाडले !!


चांदेकसारे गाम्रथांनी समृद्धी महामार्ग चे काम बंद पाडले !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 चांदेकसारे गावाजवळुन जाणाऱ्या समृद्धी महामार्ग चे काम करणाऱ्या गायत्री कंपनीचे चांदेकसारे गावामध्ये ऑफिस असून एक सिमेंट मिक्सर प्लांट आहे .या कामासाठी मागील अडीच वर्षा पासून परीसरात अवजड वाहने ये जा करत असुन त्यासाठी भैरवनाथ मंदिर रस्ता व गावातील इतर रस्ते सर्रासपणे  वापरले जातात परंतु आजमितिला या रस्त्यांची खूप दुरवस्था झाली आहे ,रस्त्यानं जाणे - येणे मुश्किल झाले असुन धूळ आणि अवजड वाहनांच्या कर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,

तसेच गायत्री कंपनी ने  चांदेकसारे ग्रामपंचायतशी कंपनी वापरत असलेल्या परीसरातील  रस्त्यांचे देखभाली बाबत करार करून देऊन सर्व रस्ते करण्याचे आश्वासन दिले होते तसेच गावातील अनेक विकास कामांना मदत करण्याचे मान्य केले होते

,परंतु रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करून या कराराला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली,म्हणून  चांदेकसारे ग्रामस्थांनी काल रात्री पासून गायत्री कंपनी चे काम पूर्णपणे बंद पाडले, यापुढे आधी रस्ते आणि मगच काम अशी कणखर भूमिका ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहीती विलास आनंदराव चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी स दिली आहे .

 यावेळी विलासराव आनंदराव  चव्हाण,सचिन भगीरथ होन,किरण अर्जुन होन,राजू पोपट होन,शरद रावसाहेब होन,रवींद्र खरात,सुनिल पांडुरंग होन,कर्ण चव्हाण,दिलीप धर्मा होन,नितीन दगु होन,अशोक पोपट होन सर,गोपीनाथ ताते,बाळासाहेब गुजर,भास्कर होन,बाबासाहेब गुजर,फजलू शेख,अरुण खरात,प्रविण होन,धीरज बोरावके,नानासाहेब होन,डॉ.रोकडे,मा.सरपंच संजय लाला होन आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News