कोपरगांव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचा चांदेकसारे परिसरातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार !!


कोपरगांव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचा  चांदेकसारे परिसरातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच रुजु झालेले पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब यांचा चांदेकसारेगावचे माजी सरपंच केशवराव होन उपसरपंच विजय होन, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनिष गाढे यांच्या हस्ते तालुका पोलीस ठाण्यात सत्कार पुष्पहार घालुन व पेढे भरवुन सत्कार केला व् त्यांना भावी वाटलीस शुभेच्छा दिल्या .

अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापन मंडळाची बैठकीत दौलतराव जाधव यांची कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदावर नेमणुक करण्यात आली.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व तालुका पोलीस  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांची बदली झाल्यानंतर दोनही जागा रिक्त झाल्या होत्या त्यानुसार दौलतराव जाधव यांची तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणुक करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव हे आतिशय शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असुन या अगोदर त्यांनी शिर्डी पोलीस ठाणे व कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे काम केले असल्याने पुढील कार्यात त्यांना या अनुभवाचा निश्चित फायदा होणारे असल्याचे चांदेकसारेगावचे माजी सरपंच केशवराव होन यांनी सांगीतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News